केरळमधील नेदूवथूर येथे रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी गर्लफ्रेंडला घऱी आणल्याने सर्वांसमोर त्याचा अपमान करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसातच मृतदेह आढळला आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता ही आत्महत्या असल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

२८ वर्षीय के के श्रीजीथ हा कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाथालाचा रहिवासी होता. रविवारी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन तो घरी गेला होता. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. श्रीजीथ हा व्यवसायाने सेल्समन होता. एका दुसऱ्या गावात आपल्या मोठ्या बहिणीसोबत तो राहत होता.

‘जेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा जवळच राहणाऱ्या त्याच्या काकांनी इतरांना याबद्दल सांगितलं आणि त्याच्या घराबाहेर गर्दी केली. त्यांनी त्याच्यावर आरडाओरडा करत अपमान करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती चुलतभाऊ के सिवरामन याने दिली आहे.

पोलिसांनी मात्र शेजाऱ्यांनी श्रीजीथचा अपमान केल्याचा दावा निराधार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे.