वॉशिंग्टन : कोविड १९ प्रतिबंधक लशीवरील बौद्धिक संपदा विषयक निर्बंध माफ करण्याच्या भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या प्रस्तावास अमेरिका पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हाइट हाऊसने तसे संकेत दिले असून लशीच्या बौद्धिक संपदेविषयक काही निर्बंध तात्पुरते रद्द करण्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर उपचार, चाचण्या व कोविड १९ लशी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बायडेन प्रशासनाने भारताच्या प्रस्तावास पाठिंबा देण्याचे संकेत हे काही अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधींनी पाठिंबा दिल्यानंतर साठ दिवसांनी दिले आहेत. ना नफा ना तोटा तत्त्वावर अमेरिकेतील काही कंपन्या लशीचे उत्पादन करण्यास तयार असल्याचे व्हाइट  हाऊसला कळवण्यात आले. त्यांनीच भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या प्रस्तावास पाठिंबा देण्याचे आवाहन व्हाइट हाऊसला केले होते. जागतिक व्यापार संघटनेकडून लशीवर  लागू असलेले बौद्धिक संपदा अधिकार काही काळापुरते माफ करण्याचा हा प्रस्ताव आहे. आधीच्या ट्रम्प प्रशासनाने या प्रस्तावास नकार दिला होता.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

… तर ना नफा ना तोटा तत्त्वावर उत्पादन

भारतीय दूतावासाने अमेरिकी काँग्रेसच्या अनेक सदस्यांना बौद्धिक संपदा हक्क व इतर बाबी तूर्त माफ करण्याची विनंती केली होती. त्यामुळे लशीचे उत्पादन ना नफा ना तोटा तत्त्वावर करता येणार असून तंत्रज्ञान हस्तांतरातही प्रगती होईल. बौद्धिक संपदा हक्क तात्पुरते स्थगित करण्याचा विचार व्हाइट हाऊस करीत आहे. याबाबत एक बैठक २२ मार्च रोजी घेण्यात आली होती पण त्यात निर्णय होऊ शकला नव्हता.