पहिल्या लॅपटॉप संगणकाचे डिझाइन तयार करणारे ब्रिटिश औद्योगिक आरेखक बिल मॉगरिज यांचे शनिवारी निधन झाले. १९७९ मध्ये त्यांनी पहिला लॅपटॉप तयार केला होता. स्मिथसॉनियन कूपर हेविट नॅशनल डिझाइन म्युझियमने म्हटले आहे की, मॉगरिज हे ६९ वर्षांचे होते व त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांनी ग्रीड कंपास हा संगणक तयार केला होता व तो अमेरिकी लष्करात प्रथम वापरला गेला. नंतर तो १९८५ मध्ये डिस्कव्हरी या स्पेस शटलमध्ये वापरण्यात आला त्याची किंमत त्या काळात ८१५० डॉलर होती.