News Flash

काश्मिर प्रश्नात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केलाच पाहिजे- पाक पंतप्रधान

गेल्या ५० वर्षात खूप काही भोगावे लागले आहे.

Pakistani Prime Minister Shahid Khaqan Abbasi : या वादाच्या भळभळत्या जखमेमुळे दक्षिण आशियातील लोकांना गेल्या ५० वर्षात खूप काही भोगावे लागले आहे. त्यामुळे जोपर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या वादावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या परिसरातील लोक भरभराट आणि विकास साधू शकत नाही, असे अब्बासी यांनी म्हटले.

काश्मीरच्या वादात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केलाचा पाहिजे, असे मत पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहीद अब्बासी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनी देशातील जनतेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी अब्बासी यांनी म्हटले की, एखाद्या प्रादेशिक वादात हस्तक्षेप करून त्यावर तोडगा काढणे, ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारीच आहे. काश्मीरच्याबाबतीत तर ती आहेच आहे. आंतराष्ट्रीय समुदायाने घेतलेल्या पुढाकाराला संयुक्त राष्ट्रसंघाच्या चौकटीत बसवले गेले पाहिजे. जेणेकरून दक्षिण आशिया खंडामध्ये शांतता निर्माण करण्यास मदत होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

यावेळी अब्बासी यांनी शेजारी राष्ट्रांशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केले. पाकिस्तानला जगातील सर्व राष्ट्रांशी सकारात्मक आणि विधायक संबंध राखायचे आहेत. विशेषत: सार्वभौमत्मिक समानतेच्या आधारावर शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. काश्मीर परिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी शांतता नांदणे गरजेचे आहे. या वादाच्या भळभळत्या जखमेमुळे दक्षिण आशियातील लोकांना गेल्या ५० वर्षात खूप काही भोगावे लागले आहे. त्यामुळे जोपर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या वादावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या परिसरातील लोक भरभराट आणि विकास साधू शकत नाही, असे अब्बासी यांनी म्हटले.

गेल्याच महिन्यात शाहिद खाकन अब्बासी यांची पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून निवड झाली होती. अब्बासी हे ४५ दिवसांसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर राहणार आहेत. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाने शरीफ यांचे भाऊ शहबाज या पदावर बसण्यायोग्य होईपर्यंत अब्बासी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून मान्यता दिली होती. पाकिस्तानात अशाप्रकारे निवडीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पूर्वीचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्ष मुस्लिम लीग कयाद-ए-आजम कडून शौकत अजीज यांची निवड होईपर्यंत राजकीय नेते चौधरी शुजात हुसैन यांना हंगामी पंतप्रधान बनवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 12:45 pm

Web Title: international community must play role in resolution of kashmir dispute pakistan pm abbasi on independence day
Next Stories
1 अॅम्बी व्हॅली विकणे आहे! लिलाव प्रक्रियेसाठी राखीव किंमत ३७ हजार कोटी रुपये
2 केंद्राच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या आदेशाला पश्चिम बंगालकडून केराची टोपली
3 धक्कादायक…अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरुन फेकले
Just Now!
X