23 September 2020

News Flash

तालिबानकडून प्रिन्स हॅरीला जिवे मारण्याची धमकी

तालिबान व अन्य दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेल्या सैन्यात पुन्हा एकदा दाखल झालेले ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तालिबानकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

| September 11, 2012 09:54 am

तालिबान व अन्य दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेल्या सैन्यात पुन्हा एकदा दाखल झालेले ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तालिबानकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने उपग्रह वाहिनीवरून ही धमकी दिली. अफगाणिस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्यात २००८ मध्ये हॅरी प्रथम सहभागी झाले होते, मात्र त्यावेळी ते मध्येच मायदेशी परतले होते. वैमानिक व कॅप्टनपदावर असणारे हॅरी आता नव्याने या सैन्यात दाखल झाले असून त्यांच्यावर अ‍ॅपेक हेलिकॉप्टर चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय अत्याधुनिक असणारी ही हेलिकॉप्टर शत्रूवर अगदी जवळून व झपाटय़ाने हल्ला करून परतू शकत असल्याने ती तालिबानसाठी डोकेदुखीची ठरली आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने याच मुद्दय़ावर बोट ठेवले. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून लढणारा प्रत्येक जण आमचा शत्रू आहे, त्यातही हॅरी हे आमचे प्रमुख लक्ष्य असतील. अ‍ॅपेक हेलिकॉप्टरमुळे ते आमचा अधिक विध्वंस करू शकतात, त्यामुळेच त्यांना अटक करणे अथवा ते शक्य न झाल्यास ठार मारणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2012 9:54 am

Web Title: international deshvidehs taliban prince harry terrorist afghanistan threat to prince harry britain uk
टॅग Taliban,Terrorist
Next Stories
1 अणू प्रकल्पविरोधी आंदोलनाला हिंसक वळण
2 बिल मॉगरिज यांचे निधन
3 लाभार्थीत यूपीएचे मंत्री व खासदार आघाडीवर
Just Now!
X