03 March 2021

News Flash

…म्हणून आज साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिन

International Mother language day

मराठी, हिंदी आणि भारतीय भाषांबद्दल बोलत असताना जागतिक स्तरावरही अनेक मातृभाषा आहेत. या जगभरातील मातृभाषा जपल्या जाव्यात या निमित्ताने आज (२१ फेब्रुवारी) जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राकडून (UN) २००० या वर्षापासून हा दिवस साजरा करायला सुरूवात झाली. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक मातृभाषा लोप पावत चालल्याचे चित्र आहे. मात्र असे होऊ नये यासाठी युनेस्कोने पुढाकार घेत मातृभाषा आणि त्यासोबत संबंधित संस्कृती टिकावी यासाठी आजच्या दिवसाची निवड केली आहे. त्यामुळे जगभरात आजचा दिवस International Mother language day म्हणून साजरा केला जातो.

यंदा या दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी स्पेशल थिम ठरवण्यात आली आहे. Indigenous languages as a factor in development, peace and reconciliation असा त्याचा विषय आहे. याचाच अर्थ आपल्या स्थानिक भाषांचा आपल्या विकासामध्ये, शांतता प्रस्थापित करण्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये जगभरातील स्थानिक भाषांमधील ‘म्हणी’ (Proverb) एकत्र केल्या जाणार आहेत. यासाठी जगभरातून लोकांनी त्यांच्या मातृभाषेमध्ये वापरात असलेल्या म्हणी संयुक्त राष्ट्राला पाठवायच्या आहेत. मात्र या म्हणींचा वापर प्रामुख्याने शांतता, सैख्य, आनंद यासाठी वापरात असणं आवश्यक आहे.

भारत पाकिस्तानाच्या फाळणीमध्ये जागतिक मातृभाषा दिवसाच्या सेलिब्रेशनचं मूळ आहे. भारत- पाकिस्तानामध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा ही उर्दू असेल असे सांगण्यात आले. मात्र पश्चिम पाकिस्तान म्हणजे बांग्लादेशातील स्थानिकांना हे मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी मोहिम सुरु केली. १९५६ साली बंगाली ही पाकिस्तानातील दुसरी अधिकृत भाषा झाली. या लढ्यात अनेकांनी बलिदानही दिले आहे. जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेडण्यात आलेली ही विशेष मोहिम लक्षात घेता संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. बांग्लादेशामध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. तर भारतामध्ये पश्चिम बंगाल भागामध्येही २१ फेब्रुवारी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:00 pm

Web Title: international mother language day 2019 history theme for the year celebration across globe
Next Stories
1 हुंड्यात रिक्षा मिळाली नाही, व्हॉट्सअपवर तिला तिहेरी तलाक
2 अजित डोवाल यांच्या अपयशाची जबाबदारी मोदी का स्वीकारत नाहीत?
3 ‘संवादाने प्रश्न सुटत असते तर तुम्हाला तीन लग्नं करावी लागली नसती’, रामूचा इम्रान यांना टोला
Just Now!
X