आज जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना गुगलने डुडलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी डुडलने तयार केलेल्या व्हिडिओत अॅनिमेशनचाही वापर करण्यात आला आहे.
आज महिला किती सक्षम झाल्या आहेत याचा व्हिडिओच गुगलने सादर केला आहे. जगभरातील महिलांनी व्हिडिओतून आपापल्या भाषेत प्रतिक्रिया दिल्याचे दाखविण्यात आले आहे. गुगलने १३ देशांमध्ये भेटी दिल्या तसेच तिकडच्या ३३७ महिला आणि मुलींना, ‘वन डे आय विल..’ हे वाक्य पूर्ण करण्यास सांगितले. त्यावर देशासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवण्याची इच्छा ते अगदी समलैंगिक विवाह करण्याची इच्छा यावेळी महिलांनी बोलून दाखविली. व्हिडिओच्या शेवटी मलाला युसुफझाई आणि सामाजिक कार्यकर्त्या मुझुन अलमेल्लाह यांनी, एके दिवशी सर्व मुली शाळेत जाताना दिसतील असा विश्वास व्यक्त केला.
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा