16 January 2021

News Flash

योग रंगात न्हाऊन निघाली संयुक्त राष्ट्राची इमारत

जगभरात योग दिवस साजरा केला जातोय

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाची इमारत योग रंगात न्हाऊन निघाली आहे. आज जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. त्या धर्तीवर संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर सूर्य नमस्काराची योगासन मुद्राच्या फोटो झळकला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या इमारातीच्या उत्तर दिशेला असलेल्या दरवाजावर हा फोटो झळकला आहे. भारताच्या स्थायी मिशनने पाचवा योग दिन उत्सवात साजरा केला. योग दिवसाचे औचित्य साधत संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. यामध्ये अनेक आधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांच्यासह अनेक आधिकाऱ्यांनी भाग घेतला.

२१ आणि २२ जून असे दोन दिवस संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयांमध्ये योग दिवस साजरा केला जाणार आहे. यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रावारी २१ जून रोजी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये ‘जलवायूच्या संरक्षणासाठी योगाचे महत्व’ या विषयावर चर्चा आयोजित केली आहे.

२१ जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघानं घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2019 9:32 am

Web Title: international yoga day surya namaskar poses light up un headquarters nck 90
Next Stories
1 योगविद्येचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा – माता अमृतानंदमयी
2 केंद्रीय मंत्री, आधिकारी सेलिब्रेटी यांच्यासह जगभरात केली जातेय योगसाधना
3 International Yoga Day : पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजारो लोकांसोबत योगसाधना!
Just Now!
X