05 March 2021

News Flash

इंटरपोलच्या अध्यक्षांना चीनने चौकशीसाठी घेतले ताब्यात

आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई हे चीनमधून बेपत्ता झाले नसून त्यांना तेथील यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई

आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई हे चीनमधून बेपत्ता झाले नसून त्यांना तेथील यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हाँगकाँग स्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिले आहे. शुक्रवारी मेंग हाँगवेई हे चीनमधून बेपत्ता झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. इंटरपोलचे अध्यक्ष बनणारे मेंग हे पहिले चिनी व्यक्ति आहेत.

मेंग हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते. मेंग यांना त्यांच्या विरोधातील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी चीनच्या शिस्तपालन समितीन ताब्यात घेतले आहे. मागच्या आठवडयात ते चीनमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. कुठे त्यांना ठेवण्यात आलं आहे ? कुठे त्यांची चौकशी सुरु आहे ? याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

हाँगवेई बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिल्यानंतर फ्रान्स पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला होता. इंटरपोलच्या अध्यक्षपदी नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते. २०२० पर्यंत ते इंटरपोलच्या प्रमुख पदी राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 12:21 pm

Web Title: interpol chief detained in china for questioning
टॅग : China
Next Stories
1 मुखी महात्मा गांधींचे नाव आणि मनात मात्र नथुराम; काँग्रेसचा मोदींवर नेम
2 मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली – काँग्रेस
3 आज दुपारी पाच राज्यातील निवडणूकांचे बिगुल वाजणार
Just Now!
X