19 January 2021

News Flash

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस

प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. भारतातील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी इंटरपोलकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंटरपोलकडून याआधी नीरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वी यांच्याविरोधातही नोटीस काढण्यात आली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस एका प्रकारे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट असतो. यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येईल. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

नीरव मोदीची पत्नी अमी मोदीला २०१९ मध्ये अमेरिकेत पाहण्यात आलं होतं. तपास यंत्रणांना सध्या ती नेमकी कुठे आहे याबद्दल खात्रीलायक माहिती नाही. दुसरीकडे पंजाब बँक घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीच्या कोठडीत २७ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला ब्रिटनमधील न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं होतं. गतवर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून नीरव मोदी लंडनमधील वांड्सवर्थ कारागृहात बंद आहे.

याआधी नीरव मोदीच्या कोठडीत ६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण करण्यावरुन सध्या सुनावणी सुरु आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेसोबतच इतर जवळपास कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतात वेगवेगळ्या यंत्रणांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. याप्रकरणी नीरव मोदीसोबत मेहुल चोक्सीही फरार आहे.

ईडीने जुलै महिन्यात नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई केली होती. ईडीकडून नीरव मोदीची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळीमधील समुद्र महल येथील चार फ्लॅट, फार्म हाऊस, अलिबागमधील जमीन, लंडनमधील फ्लॅट, युएईमधील घर आणि इतर गोष्टींचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 4:34 pm

Web Title: interpol red conrer notice nirav modis wife ami modi sgy 87
Next Stories
1 चिनी फायटर जेट्सचा वेध घेण्यासाठी भारताने तैनात केली ‘इग्ला’ सिस्टिम
2 प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक – सुप्रीम कोर्ट
3 १५ गुन्हे दाखल असणाऱ्या आमदाराची गुजरात सरकारकडून पोलीस तक्रार केंद्रांचा सदस्य म्हणून नियुक्ती
Just Now!
X