News Flash

विज्ञानयोगी डॉ. अब्दुल कलाम यांचा अल्पपरिचय

विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या या अग्निपुरूषाने शिलाँग येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारताच्या या विज्ञानयोगी महापुरूषाचा अल्पपरिचय...

| July 27, 2015 10:33 am

ज्येष्ठ वैज्ञानिक, भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या या अग्निपुरूषाने शिलाँग येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारताच्या या विज्ञानयोगी महापुरूषाचा अल्पपरिचय…

डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला. डॉ. कलाम यांनी भारताच्या डीआरडीओ संस्थेसोबत अनेक वर्षे काम केले. अग्नि क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे कलाम यांचे नाव जगभरात पोहचले. २५ जुलै २००२ रोजी डॉ. कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले आणि प्रथमच प्रत्यक्ष राजकारणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेली व्यक्ती राष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या असामान्य विचारशक्ती असलेल्या कलाम यांचा जीवनप्रवास सर्वांसाठी स्फूर्तीदायक ठरेल असा आहे. पृथ्वी आणि अग्नी सारखे क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच देशातील पहिले स्वदेशी उपग्रह पीएसएलव्ही-३ विकसीत करण्यात कलाम यांचे महत्त्वाचे योगदान आहे. १९९८ मध्ये पोखरण अणु चाचणीचे कलाम यांनी नेतृत्व केले होते. कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ १९९७ मध्ये देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने(भारतरत्न) सन्मानित करण्यात आले होते.

संबंधित बातम्या-
* देशात संशोधन संस्कृती रुजवण्याची गरज -डॉ. कलाम
* तुम्हाला महान बनवण्यासाठी देशच सक्षम! – कलाम
* एपीजे अब्दुल कलाम यांची सर्वात मोठी खंत
* ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’वर विश्वास नाही! – डॉ. कलाम
* ‘अभियांत्रिकी शिक्षणात कौशल्य विकासाला प्राधान्य हवे’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 10:33 am

Web Title: introduction of former president abdul kalam
Next Stories
1 ‘भाजपशी एकनिष्ठ पण पुढचे सांगणे कठीण’
2 …तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- राजनाथ सिंह
3 मोदी हे कालिया नाग – लालूप्रसाद
Just Now!
X