News Flash

भारताचे प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण

ट्रम्प सरकार भारताच्या या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत आहेत. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनेक राजकीय चर्चांचा विचार करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

भारताकडून पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रणावर ट्रम्प यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारताने पाठवलेल्या या प्रस्तावावर अमेरिकन प्रशासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात ट्रम्प यांना हे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ट्रम्प सरकार भारताच्या या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनेक राजकीय चर्चांचा विचार करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

जर ट्रम्प यांनी भारताचे हे निमंत्रण स्विकरले तर यापूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत झालेल्या भेटीपेक्षा यावेळी परस्परांमधील आश्वासने अधिक नाट्यमय असतील. २०१५मध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तत्कालिन अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मोदी सरकारचे पहिले प्रमुख पाहुणे बनले होते.

सध्या जगातील जवळजवळ प्रत्येक देशाची ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सामान्य ठेवण्यासाठी धडपड सुरु आहे. ट्रम्प यांचा कडक आणि चिडचिडा स्वभाव इतर देशांसाठी सामंजस्याची भुमिका घेणे आव्हान ठरते. त्यामुळे जर भारत हे सर्व दिव्य पार करु शकला तर भारत यासाठी अपवाद असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 6:54 am

Web Title: invitation to donald trump for the main event of the republic day of india
Next Stories
1 परदेशी आर्थिक सल्लागारांनी सोडली मोदी सरकारची साथ; स्वदेशी तज्ज्ञांवरच PMOची भिस्त
2 देशात सव्वादोन कोटी बालकामगार
3 फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड
Just Now!
X