आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने पी चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र पी चिदंबरम बेपत्ता होते. अखेर २७ तासांनंतर पी चिदंबरम समोर आले आणि काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यानंतर सीबीआय त्यांना अटक करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात दाखल झाली होती. पण पी चिदंबरम घरी रवाना झाल्याने सीबीआयदेखील तिथे पोहोचलं आणि अटकेची कारवाई केली. मात्र यावेळी पी चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

गेट उघडला जात नसल्याने सीबीआयला घरात प्रवेश करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

Live Blog

Highlights

    22:04 (IST)21 Aug 2019
    पी चिदंबरम यांना सीबीआय मुख्यालयात नेण्यात आलं आहे
    21:52 (IST)21 Aug 2019
    पी चिदंबरम यांना ताब्यात घेऊन अधिकारी रवाना झाले आहेत
    21:47 (IST)21 Aug 2019
    पी चिदंबरम ताब्यात

    अखेर ३० तासांनंतर पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

    21:42 (IST)21 Aug 2019
    दिल्ली पोलिस उपायुक्त आणि सहआयुक्त पी चिदंबरम यांच्या घरी दाखल

    दिल्ली पोलिस उपायुक्त आणि सहआयुक्त पी चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले आहेत. ईडी आणि सीबीआयची टीम आधीच निवासस्थानी हजर आहे.

    21:42 (IST)21 Aug 2019
    ईडीची एक टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानावरु रवाना

    ईडीची एक टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानावरुन रवाना झाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला सील करण्यास सुरुवात केली आहे.

    21:37 (IST)21 Aug 2019
    पी चिदंबरम यांच्या घराबाहेर अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न
    21:36 (IST)21 Aug 2019
    सीबीआयचे मुख्य संचालक चिदंबरम यांच्या निवासस्थानी

    परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सीबीआयचे मुख्य संचालक चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

    21:33 (IST)21 Aug 2019
    ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल
    21:31 (IST)21 Aug 2019
    चिदंबरम यांच्या घराबाहेर समर्थकांचा जोरदार गोंधळ

    चिदंबरम यांच्या घराबाहेर समर्थकांचा जोरदार गोंधळ सुरु असून पोलीस त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

    21:30 (IST)21 Aug 2019
    सीबीआयच्या कारवाईवर कार्ती चिदंबरम यांचं ट्विट
    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Inx media case congress leader p chidambaram cbi ed supreme court sgy
    First published on: 21-08-2019 at 20:15 IST