News Flash

INX Media Case : पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

सीबीआय कोर्टाने वकील आणि चिदंबरम यांच्या नातेवाईकांना रोज ३० मिनिटं भेटण्याची संमती दिली आहे

P Chidambaram INX Media Case: पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. २७ तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणींत वाढच होत आहे.

पी चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची बाजू अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. सीबीआयकडून पाच दिवसांची कोठडी मागण्यात येईल अशी चर्चा होती. आता सीबीआय कोर्टाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सीबीआय कोर्टाने वकील आणि चिदंबरम यांच्या नातेवाईकांना रोज ३० मिनिटं भेटण्याची संमती दिली आहे. पी चिदंबरम हे चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता. मात्र कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी हा दावा खोडून काढला. चिदंबरम यांना जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणात अडकवलं जातं आहे. त्यांनी आत्तापर्यंत चौकशीला वारंवार सहकार्य केलं आहे. तरीही त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. कालपासून ते झोपलेले नाहीत, त्यांना त्रास दिला जातो आहे असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.

अटक होण्याआधी काँग्रेस मुख्यालयात बुधवारी चिदंबरम यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, ‘‘मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला. पण मी उलट न्यायासाठीच गेले २७ तास माझ्या वकिलांशी चर्चा करीत होतो. मी कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. मी, माझा मुलगा किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. शुक्रवारी मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहे.

Live Blog
17:08 (IST)22 Aug 2019
अटकेसाठी दवाब का?

मागील ११ महिन्यापासून सीबीआयने चिदंबरम यांना साधा एक फोन केला नाही. मग आता त्यांच्या अटकेसाठी दवाब का? चौकशीदरम्यान सीबीआयने चिदंबरम यांना जे ६ प्रश्न विचारले ते जुने आहेत. - सिंघवी

16:33 (IST)22 Aug 2019
सीबीआयची चिदंबरमना अटक करण्याची पद्धत देशासाठी लाजीरवाणी – स्टालिन

अटकपूर्व जामिनासाठी चिदंबरम यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल असताना त्यावर कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच सीबीआयने ज्या प्रकारे चिदंबरम यांना अटक केली ही बाब भारतासाठी लाजिरवाणी असल्याचे डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन यांनी म्हटले आहे.

16:18 (IST)22 Aug 2019
इतर आरोपींना जमानत मिळाली - कपिल सिब्बल

या प्रकरणात इतर आरोपींना जमानत मिळाली आहे. चिदंबरम यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाशी काहीही संबंध नाही. - कपिल सिब्बल, वकील

16:16 (IST)22 Aug 2019
चिदंबरम याच्या विनंतीनंतरही सीबीआयने अटक केली

मी रात्रभर झोपलो नाही त्यामुळे उद्या सकाळी अटक करा, अशी विनंती चिदंबरम यांनी सीबीआयला केली होती. मात्र, सीबीआयने त्यांना अटक केली आहे. - कपिल सिब्बल, वकील

16:14 (IST)22 Aug 2019
सीबीआयचे प्रश्नही तयार नाहीत.

या प्रकरणावर सीबीआयचे प्रश्नही तयार नाहीत. चिदंबरम यांना चौकशी दरम्यान फक्त १२ प्रश्न विचारले आहेत. - कपिल सिब्बल, वकील

16:13 (IST)22 Aug 2019
चिदंबरम सीबीआयच्या चौकशीपासून कधीच पळाले नाहीत

चिदंबरम सीबीआयच्या चौकशीपासून कधीच पळाले नाहीत. सीबीआय आणि ईडीने जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलवलं तेव्हा ते हजर राहिले आहेत. - कपिल सिब्बल, वकील

16:10 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांनी सीबीआयच्य प्रश्नाची उत्तरे द्यावी - राऊत

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सीबीआयच्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.

16:08 (IST)22 Aug 2019
दहा वर्षानंतर प्रकरण का उघडले?

चिदंबरम यांच्याकडून कोर्टात काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. दहा वर्षानंतर प्रकरण का उघडले? असा प्रश्न सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीबीआयचे प्रश्न तयार नाहीत. ते चिदंबरम यांना प्रश्न विचारू शकत नाही.

15:50 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांनी मंत्रीपदाचा चुकीचा वापर केला - तुषार मेहता

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात सीबीआयकडून कोर्टात बाजू मांडली. तुषार मेहता यांनी सीबीआयकडून पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि अजामीनपत्र वॉरंटची मागणी केली. यावेळी कोर्टात बाजू मांडण्यासाठी ते म्हणाले की, चिदंबरम यांनी मंत्रीपदाच्या शक्तीचा चुकीचा वापर केला.  आयएनएक्स मीडियाने चुकीच्या पद्धतीने करार केला आहे.  चिदंबरम तपासातही सहकार्य करत नाहीत.   मंत्रीपदावर असताना चिदंबरम यांनी खासगी कंपनींना फायदा करून दिला. 

15:45 (IST)22 Aug 2019
अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, सीबीआय़ची मागणी

पाच दिवसांची कोठडी आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी सीबीआयकडून कोर्टात करण्यात आली आहे.

15:43 (IST)22 Aug 2019
पाच दिवसांच्या कोठडीची मागणी

सीबीआयने कोर्टामध्ये चिदंबरम यांची पाच दिवसांची कोठडी मागितली आहे.

15:41 (IST)22 Aug 2019
सुनावणीला झाली सुरूवात

चिदंबरम सीबीआय न्यायालयात हजर झाले असून सुनावणीला सुरूवात झाली आहे. त्यांची पत्नी आणि मुलगाही उपस्थित आहेत. चिदंबरम यांच्यासोबत चार मोठे वकील आहेत.

15:23 (IST)22 Aug 2019
पी. चिदंबरम आणि त्यांची पत्नी कोर्टात हजर

पी चिदंबरम आणि त्यांची पत्नी हे दोघेही कोर्टात हजर झाले आहेत. आता पुढे अनेक नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. सीबीआयने त्यांना अटक केली आणि आता कोर्टासमोर हजर केलं आहे. सीबीआय चिदंबरम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी करणार असल्याचंही समजतं आहे. 

14:45 (IST)22 Aug 2019
न्यायप्रक्रियेबाबत मी काही बोलणार नाही - ममता

ज्येष्ठ नेते चिदंबरम देशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री आहेत. न्यायप्रक्रियेबाबत मी काही बोलणार नाही. मात्र, काहीवेळेला चुका होतात. अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे दिली आहे.

14:27 (IST)22 Aug 2019
वकील विवेक तनखा कोर्टात पोहचले, थोड्यात वेळात चिदंबरम यांना हजर करणार

थोड्यात वेळात चिदंबरम यांना राउज ऐवेन्यू कोर्टात हजर करणार आहेत. त्यांचे वकील विवेक तनखा कोर्टात पोहचले आहे. कार्ति चिदंबरम आणि अभिषेक मनु सिंघवीही उपस्थित

14:12 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे - भाजपा

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसने केलेल्या आरोपावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपाची कोणतीही भूमिका नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.

14:11 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे - भाजपा

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसने केलेल्या आरोपावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपाची कोणतीही भूमिका नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.

13:51 (IST)22 Aug 2019
“मी कधीही इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला भेटलो नाही”

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम त्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे आले आहेत. कार्ती यांनी गुरूवारी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. आपण कधीही इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीला भेटलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले....सविस्तर वाचा

13:41 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना थोड्याच वेळात सीबीआय कोर्टात हजर करणार

13:15 (IST)22 Aug 2019
जंतर मंतरवर आंदोलन

कार्ती चिदंबरम यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठींबा देत उपस्थिती दर्शवली आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासह सीपीआयएम नेते सीताराम येचुरी, प्रकाश करात, वृंदा करात आणि रामगोपाल यादव आंदोलनाला उपस्थित राहिले आहेत.

12:11 (IST)22 Aug 2019
थोड्याच वेळात चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात येणार

आज (गुरूवार, २२ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी सीबीआय १४ दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.  

11:48 (IST)22 Aug 2019
तर चिदंबरम यांची प्रतिष्ठा कायम राहिली असती - भाजपा

चिदंबरम स्वत: कायद्याचे चांगले जाणकार आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांनी असे वर्तन करायला नको होते. जे चांगले घडलेले नाही. जर ते अगोदरच सीबीआयकडे हजर झाले असते तर त्यांची प्रतिष्ठा कायम राहिली असती. - सत्यपाल सिंह, भाजपा

11:42 (IST)22 Aug 2019
जंतर मंतरवर आंदोलन करणार - कार्ती

माझ्या वडिलांसोबत काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन करणार आहे. त्यासाठी मी जंतर मंतरकडे जात आहे. - कार्ती

11:27 (IST)22 Aug 2019
ज्या सीबीआय मुख्यालयाचं उद्घाटन केलं तिथेच अटक होऊन पोहोचले चिदंबरम

चिदंबरम यांना अटक करून सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात आलं आहे. यातील एक भाग असा की त्यांना अटक करून ज्या सीबीआयच्या ज्या इमारतीत आणण्यात आलं आहे त्या इमारतीच्या उद्घाटनादरम्यान चिदंबरम हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते....वाचा सविस्तर

11:26 (IST)22 Aug 2019
पी. चिदंबरम यांच्या अटकेला कारणीभूत ठरली इंद्राणी मुखर्जीची ‘ती’ साक्ष !

आयएनक्स मीडियाचे प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी दिलेल्या साक्षीमुळे चिदंबरम अडचणीत आले असून त्यांच्या साक्षीमुळेच चिदंबरम यांना अटक झाल्याची जोरदार चर्चा आहे.... वाचा सविस्तर

11:17 (IST)22 Aug 2019
देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला अटक करणे चुकीचे

पी चिदंबरम यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. गेली ४० वर्षे देशाची सेवा केलेल्या व्यक्तीला अटक करणं चुकीचं आहे. - काँग्रेस

11:07 (IST)22 Aug 2019
व्यक्तिगत बदला घेण्यासाठी भाजपा ईडी आणि सीबीआयचा वापर करतेय - काँग्रेस

मागील दोन दिवसांत देशाने TV च्या माध्यमातून लोकशाहीची हत्या झाल्याचे पाहिले. भाजपा सरकारने ईडी आणि सीबीआयचा व्यक्तिगत बदला घेण्यासाठी वापर केला आहे. त्यातूनच माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांना अटक केली आहे. चिदंबरम यांना अटक करून मोदी सरकारने व्यक्तिगत फायद्यासाठी सीबीआय आणि ईडीचा वापर केल्याचे दाखवून दिले आहे. व्यक्तीगत फायद्यासाठी भाजपा कोणत्या स्तराला जाऊ शकते.

11:05 (IST)22 Aug 2019
म्हणून चिदंबरम यांच्या अटकेचा ड्रामा - काँग्रेस

देशात सुरू असणाऱ्या मंदीवर उपाय शोधण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. लाखो लोकांचे रोजगार जात आहेत. रूपयाची किंमत घसरली आहे. यावरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने मागील दोन दिवसांत चिदंबरम यांच्या अटकेचा ड्रामा केला आहे.

10:54 (IST)22 Aug 2019
भाजपा पुरावा गोळा करण्यात अपयशी - काँग्रेस

१२ वर्ष जुन्या केसमध्ये गिरफ्तारीचा अर्थ काय ? मागील पाच वर्षात भाजपा पुरावा गोळा करण्यात अपयशी ठरले आहे. - काँग्रेस

10:52 (IST)22 Aug 2019
भाजपाचा अजेंडा पुर्णपणे चुकीचा आहे - काँग्रेस

भाजपा चुकीच्या उद्देशाने प्रचार करण्यात व्यस्त आहे. त्यांचा हा अजेंडा पुर्णपणे चुकीचा आहे - काँग्रेस

10:50 (IST)22 Aug 2019
चिदंबरम किंवा त्यांचे मुलाचे नाव नव्हते - काँग्रेस

एफआयआरमध्ये वित्त मंत्रालयातील आधिकाऱ्यांची नावे आहेत. चिदंबरम किंवा त्यांचे मुलाचे नाव नव्हते. आतापर्यंत या प्रकरणाची चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही - काँग्रेस

10:47 (IST)22 Aug 2019
काँग्रेसने भाजपावर साधला निशाणा

मुलीची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या जबाबावर ४० वर्ष देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली - काँग्रेस

10:44 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांची अटक ही लोकशाहीची हत्या - काँग्रेस

चिदंबरम यांची अटक ही लोकशाहीची हत्या आहे. देशाची अर्थव्यवस्था अतिशय खराब आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा काम करत आहे. - रणदीप सुरजेवाला

10:41 (IST)22 Aug 2019
सरकारी यंत्रणेचा राजनैतिक फायद्यासाठी वापर - रणदिप सुरजेवाला

भाजपाने सीबीआय आणि ईडीचा राजनैतिक फायद्यासाठी वापर केला आहे.

10:39 (IST)22 Aug 2019
पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांना कधीच भेटलो नाही - कार्ती

माझ्या आयुष्यात कधीही पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांना भेटलो नाही. माझे वडिल मंत्री असताना कोणाला भेटले याबाबात मला काही माहिती नाही - कार्ती

10:37 (IST)22 Aug 2019
वडिलांसबोतच काँग्रेसला लक्ष - कार्ती

काँग्रेस पक्षाचे धन्यवाद. माझ्या वडिलांसबोतच काँग्रेस पक्षाला लक्ष केले जात आहे.   

10:36 (IST)22 Aug 2019
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला सुरूवात
10:34 (IST)22 Aug 2019
चिदंबरम यांची डोकेदुखी ठरलेले INX मीडिया प्रकरण आहे तरी काय ?

या प्रकरणात चिदंबरम यांनी ३०५ कोटीं रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण नेमके काय आहे याचा घेतलेला हा आढावा….सविस्तर वाचा

09:55 (IST)22 Aug 2019
…म्हणून न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला

अटकपूर्व जामीन नाकारताना चिदंबरम हेच मुख्य सूत्रधार असून, प्रतिष्ठेचा विचार न करता गुन्हेगाराच सत्य मांडावे. जर आर्थिक गुन्ह्यातील आरोपीना अटकपूर्व जामीन दिला. तर साधारण घटनांप्रमाणेच या प्रकरणाचा तपासही वरवर केला जाईल, असे न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटले आहे...सविस्तर वाचा

09:30 (IST)22 Aug 2019
ही घटना दुख:द - सलमान खुर्शीद

चिदंबरम यांची अटकेची घटना दुख:द असल्याची प्रतिक्रिया सलमान खुर्शीद यांनी दिली आहे.

09:28 (IST)22 Aug 2019
काँग्रेसची पत्रकार परिषद

नाट्यमय घडामोडीनंतर चिदंबरम यांना बुधवारी रात्री उशीरा अटक केली. या प्रकरणावर काँग्रेस पक्ष पत्रकार परिषद घेणार आहे. 

09:25 (IST)22 Aug 2019
सीबीआय १४ दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता

आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयने पी. चिदंबरम यांची बुधवारी रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. आज (गुरूवारी) दुपारी दोन वाजता त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत. सीबीआय न्यायालयामध्ये १४ दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता 

Next Stories
1 VIDEO: १४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच झालेल्या पहाणीतनंतर ‘टायटॅनिक’बद्दलचा धक्कादायक खुलासा
2 …म्हणून न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला
3 ज्या सीबीआय मुख्यालयाचं उद्घाटन केलं तिथेच अटक होऊन पोहोचले चिदंबरम
Just Now!
X