News Flash

स्मार्ट LPG सिलिंडर!; आता टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार

नवा एलपीजी सिलिंडर ग्राहकांच्या भेटीला आला आहे. या स्मार्ट एलपीजी सिलिंडरमुळे ग्राहकांना टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार आहे.

स्मार्ट LPG सिलिंडर!; आता टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार (Photo- Twitter)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं नवा एलपीजी सिलिंडर ग्राहकांच्या भेटीला आणला आहे. या स्मार्ट एलपीजी सिलिंडरमुळे ग्राहकांना टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार आहे. फायबरपासून हा कम्पोजिट सिलिंडर तयार करण्यात आला आहे. लवकर ग्राहकांना हा सिलेंडर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट स्वंयपाक घर डोळ्यासमोर ठेवून या सिलिंडरची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आताच्या सिलिंडरच्या तुलनेत हा स्मार्ट सिलिंडर वजनाने हलका आहे. तसंच ग्राहकांची फसवणूकही यामुळे टळणार आहे. तसेच स्मार्ट सिलिंडर सुरक्षित आहे. त्यामुळे लवकरच आताचा सिलिंडर नव्या सिलिंडरमध्ये रुपांतरीत होणार आहे.

कम्पोजिट सिलिंडर आताच्या सिलिंडरपेक्षा जास्त मजबूत आणि सुरक्षित आहे. तीन थर चढवून हा सिलिंडर तयार करण्यात आला आहे. टाकी ब्लो- मोल्डेड हाय डेनसिटी पॉलिथायनील (HDPE) इनर लायनरपासून बनवला आहे. पॉलिमर रॅप्ड फायबर ग्लासच्या एका थराने झाकण्यात आली आहे. त्याचबरोबर HDPE आउटर जॅकेट फिट करण्यात आलं आहे. यामुळे टाकीत किती सिलिंडर उरला आहे, याची माहिती मिळणार आहे. नवा सिलिंडर बुक करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच फायबर असल्याने आताच्या सिलिंडरसारखा लादीवर गंज लागणार नाही.

कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले…

आताचा सिलिंडर कम्पोजिट सिलिंडरमध्ये परावर्तित करण्यासाठी सिक्योरिटी डिपॉजिट द्यावं लागणार आहे. १० किलो सिलिंडरसाठी ३ हजार ३५० रुपये, तर ५ किलो सिलिंडरसाठी २ हजार १५० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, फरीदाबाद आणि लुधियाना या भागात स्मार्ट सिलिंडर वितरीत केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 6:51 pm

Web Title: iocl has introduced composite cylinder know how much gas is left rmt 84
टॅग : Gas Cylinder,Lpg
Next Stories
1 अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे पाकिस्तानमध्ये अपहरण ; छळ करुन केली सुटका
2 “…म्हणून मुस्लीम आठ मुलं जन्माला घालतात”; ‘टू चाइल्ड पॉलिसी’वरुन केली टीका
3 पंतप्रधान मोदी – शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…