30 September 2020

News Flash

‘इंडियन ऑइल’मध्ये नोकरीची संधी, २३० पदांसाठी होणार भरती

आयटीआय केलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिडेटमध्ये (आयओसीएल) २३० जागांसाठी भरती प्रक्रिया गुरुवारपासून (१८ जुलै) सुरु झाली आहे. तांत्रिक तसेच इतर पदांसाठीही ही भरती प्रक्रिया असून ८ ऑगस्टपर्यंत यासाठी इच्छूकांना अर्ज करता येणार आहे. अभियांत्रिक क्षेत्रातील ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पूर्णवळ आयटीआय पदवी असणारे या पदांसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर १८ ऑगस्ट २०१९ रोजी सर्व उमेदावारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल. व्यापार आणि तांत्रिक क्षेत्रातील या जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रीक, मॅकॅनिकल, सिव्हिल आणि इन्स्टुमेन्शन विभागातील पदांवर ही भरती होणार आहे. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीसंदर्भातील अटी नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड होण्याची पद्धत

लेखी परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक

९० मिनिटांच्या या लेखी परिक्षेमध्ये १०० प्रश्न विचारण्यात येतील. हे प्रश्न मल्टीपल चॉईस प्रकारातील असतील.

हिंदी आणि इंग्रजी भाषेतून ही लेखी परिक्षा देता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 11:20 am

Web Title: iocl recruitment 2019 application begins for 230 vacancies scsg 91
Next Stories
1 भाजपा आमदारांचा उशा, चादरी घेऊन कर्नाटक विधानसभेतच मुक्काम
2 कर्नाटकचं महाभारत: दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा-राज्यपाल
3 कर्नाटकचा निकाल लांबणीवर
Just Now!
X