अ‍ॅपल या विख्यात कंपनीचा ‘आयफोन ५सी’ हा स्मार्टफोन बाजारात येण्याआधीच या फोन बद्दल बऱ्याच वावड्या उठवण्यात आल्या. ‘आयफोन ५सी’ स्वस्त असल्यामुळे त्याच्यावर ग्राहकांच्या उड्यापडतील अशा चर्चेने देखील जोर धरला होता. मात्र, ‘आयफोन ५सी’ बद्लची ती केवळ अपेक्षा होती. कारण विविधरंगामध्ये उपलब्ध असलेला ‘आयफोन ५सी’ केवळ रंगानेच वेगळा आहे.
डिझाईन:
आतापर्यंतच्या आयफोनच्या मालिकेतील हा सर्वात रंगीत आयफोन आहे. ‘आयफोन ५सी’ च्या रंगाची उधळण अतिशय शितल अशा पांढऱ्या शुभ्र रंगापासून होते. मात्र, तुम्हाला काळ्या रंगाचा आयफोन हवा असल्यास त्याची बॉडी बदलण्याचा पर्याय तुमच्याकडे असणार आहे. ‘आयफोन ५सी’ अतिशय थिन शेप व हलक्या वजनामध्ये उपलब्ध आहे. ‘आयफोन ४’ पेक्षा हा जाडीमध्ये निम्माच आहे. प्लॅस्टीकची बॉडी असली तरी जोपर्यंत ‘आयफोन ५सी’ हातामध्ये घेत नाही तोपर्यंत त्याची बॉडी प्लॅस्टिकची असल्याचे जाणवत नाही. इतक्या उत्तम प्रकारे ती बणवण्यात आली आहे.
आयफोनच्या मालिकेतील आधीच्या सर्वच आयफोनचे आवाजाचे बटन गोल आहे. मात्र, ‘आयफोन ५सी’च्या आवाजाचे बटन आयताकृती आहे. ‘आयफोन ५सी’च्या खालच्या बाजूला असलेले चार छोटे होल म्हणजेच या फोनचा स्पिकर आहे. या फोनचे हेडफोन देखील वेगळ्या शेपमध्ये आहे.