News Flash

आयफोन ७ भारतीयांसाठी महागडाच, ७ ऑक्टोबरला भारतात येणार

विशेष म्हणजे आयफोनचे नवीन फोन्स अमेरिकेपेक्षा जास्त दराने भारतात विकले जाणार आहेत

आयफोन ७, आयफोन ७ प्लस आणि अॅपल वॉच २ यांचे अमेरिकेत लाँचिंग करण्यात आले असले तरी भारतातील अॅपलप्रेमींना या उत्पादनांसाठी आणखी महिनाभर वाट बघावी लागणार आहे. भारतात  नवीन आयफोन ७ ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे.

बुधवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपलच्या उत्पादनांचे दिमाखात लाँचिंग करण्यात आले. अमेरिकेत १६ सप्टेंबरपासून आयफोन ७, आयफोन ७ प्लस मिळणार आहे. २८ देशांमध्ये या फोन्ससाठी १३ सप्टेंबरपासून आगाऊ नोंदणीदेखील करता येणार आहे. पण भारतातील अॅपलप्रेमींना या फोन्ससाठी आणखी काही दिवस थांबावे लागणार आहे. महिनाभरानंतर म्हणजेच ७ ऑक्टोबररोजी अॅपलचा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस हे दोन्ही फोन ३२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीमध्ये उपलब्ध असतील. यातीला सुरुवातीचा म्हणजेच १६ जीबीचा आयफोन ७ हा फोन भारतीय बाजारपेठेत ६० हजार रुपयांपर्यंत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर आयफोन ७ प्लसची किंमत काय असेल हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

विशेष म्हणजे आयफोनचे नवीन फोन्स अमेरिकेपेक्षा जास्त दराने भारतात विकले जाणार आहेत. ३२ जीबीचा आयफोन ७ हे अमेरिकेत ६४९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४३,१००  रुपये) तर आयफोन ७ प्लस हे ७४७ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४९, ७०० रुपये) असणार आहे. तर अॅपल वॉच २ ची किंमत ३६९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार २४,५०० रुपये) या दराने विकले जाणार आहेत. तर भारतात मात्र ३२ जीबीच्या आयफोन ७ साठी तब्बल साठ हजार रुपये (सुमारे ९०२ डॉलर्स) मोजावे लागतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:57 am

Web Title: iphone 7 iphone 7 plus in india on october 7
Next Stories
1 काश्मीरबाबत सर्व संबंधितांशी संवाद हवा!
2 जनता दु:खात, मोदी सुखात!
3  ‘प्रवेश परीक्षेसारखी प्रवेश प्रक्रियाही समान हवी
Just Now!
X