सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील  पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. करोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

हेही वाचा – WTC FINAL : टीम इंडियाची नवी ‘RETRO जर्सी’ तुम्ही पाहिली का?

आज बीसीसीआयची विशेष बैठक (SGM) घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. परंतु भारतामधील करोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. विश्वचषकासाठी अमिरातीचा निर्णय घेण्यात आल्यास स्टेडियमचा आधीच ताबा घेण्यात येईल. परिणामी ‘आयपीएल’चे अमिरातीत आयोजन करणे कठीण जाईल.

हेही वाचा – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यासाठी इंग्लंडला जाणार दिनेश कार्तिक!

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 has been moved to uae for this season adn
First published on: 29-05-2021 at 13:35 IST