जुनागड येथे बदली करण्यात आल्यानंतरही अहमदाबाद येथे पोलीस कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेचा वापर केल्याच्या कारणावरून गुजरातमधील निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची हकालपट्टी करण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे भट्ट यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. भट्ट यांची जुनागड येथे बदली करण्यात आल्यावर त्यांना जुनागडमध्ये नोकरीत रूजू होण्यास वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या.  काही खटल्यांच्या कारणास्तव अहमदाबादमध्ये रहावे लागत असल्याचे भट्ट यांनी सांगितले होते. गुजरात दंगलीच्या वेळी नरेंद्र मोदी आरोपी असल्याचे त्यांनी म्हटले होते.