येमेनमध्ये सौदी अरेबियाचे हल्ले सुरू असतानाच एडनच्या आखातात बुधवारी इराणने दोन युद्धनौका पाठवल्या आहेत, असे सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. इराणचा हुथी बंडखोरांच्या चळवळीस पाठिंबा आहे. अलबोर्झ विनाशिका व बुशहर जहाज बंदर अब्बास येथून पाठवण्यात आले आहे. इराणच्या जहाजांना चाचेगिरीपासून संरक्षण मिळावे यासाठी ही जहाजे पाठवण्यात आल्याचे रिअर अ‍ॅडमिरल हबीबउल्ला सयारी यांनी प्रेस टीव्हीला सांगितले. सौदी अरेबिया व अनेक अरब देशांनी येमेनवर हवाई व नौदल र्निबध घातले असून त्याचा उद्देश हुथी बंडखोरांना हुसकावणे हा आहे.