11 July 2020

News Flash

इराणशी आण्विक प्रश्नावर राजनैतिक वाटाघाटींना सहा महिने संधी- ओबामा

वादग्रस्त अणुकार्यक्रम रद्द करण्याच्या प्रश्नावर इराण व जागतिक समुदाय यांच्यात बोलणी सुरू होण्याच्या अगोदर सहा महिने इराणला राजनैतिक वाटाघाटींसाठी संधी देण्यात येईल

| November 21, 2013 01:23 am

वादग्रस्त अणुकार्यक्रम रद्द करण्याच्या प्रश्नावर इराण व जागतिक समुदाय यांच्यात बोलणी सुरू होण्याच्या अगोदर सहा महिने इराणला राजनैतिक वाटाघाटींसाठी संधी देण्यात येईल तोपर्यंत अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी त्या देशावर आणखी र्निबध टाकण्याचा प्रस्ताव तूर्त रोखून ठेवावा, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. इस्रायल व अमेरिकी काँग्रेसचे सदस्य व आंतरराष्ट्रीय समुदाय व इराण यांना आम्ही असे सुचवतो की, येत्या सहा महिन्यात इराणच्या अण्वस्त्र प्रश्नावर राजनैतिक प्रयत्नांना संधी द्यावी, असे ओबामा यांनी सांगितले. ओबामा म्हणाले की, इराणला अण्वस्त्रे तयार करण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्व मार्गाचा अवलंब करू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2013 1:23 am

Web Title: iran has six months period for political negotiations on nuclear question obama
टॅग Barack Obama
Next Stories
1 महिला पत्रकार लैंगिक अत्याचार: गोवा सरकारकडून ‘तेहलका’ संस्थापकांच्या चौकशीचे आदेश
2 मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सैफचे प्रयत्न
3 आत्मघाती हल्ल्यात इजिप्तचे १० जवान ठार
Just Now!
X