ब्रिटिश – इराणी महिलेला तिने व्हॉलीबॉल सामन्यास हजेरी लावल्याने तेहरान न्यायालयाने एक वर्ष तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. घोनशेह घावामी ही कायद्याची पदवीधर असून ती लंडनची आहे. तिचे दुहेरी नागरिकत्व असून या प्रकरणी राजकीय वाद निर्माण झाला आहे.
  इटली व इराण यांच्यातील व्हॉलीबॉल सामना बघण्यास ती गेली होती. तिला काही तासांनी सोडून देण्यात आले पण तिला परत अटक करण्यात आली. न्यायालयाचा निकाल अयोग्य असल्याचे अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे.