28 September 2020

News Flash

आमच्या शत्रूंनी कुठलीही चूक करु नये, इराणची अमेरिकेला धमकी

अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत.

अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत. इराणने शनिवारी पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेकडून कोणताही धोका निर्माण झाल्यास ठोस प्रत्युत्तर दिले जाईल असे इराणने म्हटले आहे. गुरुवारी इराणने क्षेपणास्त्र डागून अमेरिकेचे मानवरहित ग्लोबल हॉक ड्रोन विमान पाडल्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.

अमेरिकेचे टेहळणी ड्रोन आमच्या हवाई हद्दीत आल्यामुळे ते पाडले असे इराणचे म्हणणे आहे तर ड्रोनने इराणच्या सीमेचे उल्लंघन केले नव्हते ते आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते असा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल इराणवर हल्ल्याची तयारी केली होती. पण थेट लष्करी कारवाईत इराणध्ये १५० लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचा निर्णय रद्द केला.

अमेरिकेला काहीही निर्णय घेऊं दे. आम्ही इराणच्या कुठल्याही सीमांचे उल्लंघन करु देणार नाही. अमेरिकेने आक्रमकता दाखवल्यास आम्ही त्याचा ठामपणे मुकाबला करु असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मोयुसावी यांनी तसनीमशी बोलताना सांगितले. इराण बरोबर युद्ध करण्याची इच्छा नसल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

युद्धाची आमची सुद्धा इच्छा नाही पण असा कुठलाही प्रयत्न झाल्यास तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊ असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या शत्रूंनी खासकरुन अमेरिका आणि त्यांच्या मित्रांनी हल्ल्याची चूक केल्यास त्याची झळ अमेरिकेला सहन करावी लागेल असा इशारा इराणच्या लष्कराचे प्रवक्ते अबोलफझल शीकारची यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 4:15 pm

Web Title: iran shot down drone warn america dmp 82
Next Stories
1 मुलीला चिडवणाऱ्यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी झापले
2 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
3 ट्रेनर विमान खरेदीत ३३९ कोटीचा भ्रष्टाचार, सीबीआयकडून संजय भंडारी विरोधात FIR दाखल
Just Now!
X