24 October 2020

News Flash

फुटबॉल सामना पाहिल्याने तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, इराणी तरुणीचा फोटो व्हायरल

इराणमध्ये फुटबॉल सामना पाहणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

इराणमध्ये फुटबॉल सामना पाहणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तरुणीने पोलीस व्हॅनमध्ये बसलेला आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर अनेकजण तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट चेक करत आहेत. झिनाब असं या तरुणीचं नाव आहे.

झिनाबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामधील एक सेल्फी तिने स्टेडिअममध्ये काढलेला आहे. या फोटोत तिने टोपी घातली असून चेहरा झाकलेला दिसत आहे.

इराणमध्ये महिलांना स्टेडिअममध्ये जाऊन पुरुषांचा फुटबॉल सामना पाहण्याची परवानगी नाही. मात्र त्या महिलांना खेळताना सामना पाहू शकतात. इराणमध्ये महिलांच्या सार्वजनिकरीत्या फुटबॉ़ल मॅच पाहण्यावर कट्टरतावाद्यांनी तब्बल चाळीस वर्षांपासून बंदी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

ورق بزنید من دیشب بازی رو توی وَن پلیس توی استادیوم آزادی دیدم و شبم موقع شادی توی وزرا بودم و آخر شب جای پست تبریک گذاشتن توی اینستا بازداشتگاه خوابیدم و صبح دادگاه و تعهد جرم؟؟؟؟ #دختربودن این برد و صعود تموم سختیا رو شُست و بُرد و رفت… خیلی ثبریک میگم پ ن: لیلی عزیزم خواهرم خیلی خوشحالم که تونستی بازی رو از نزدیک ببینی

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:24 pm

Web Title: iranian girl taken in custody for watching football match
Next Stories
1 Asia Cup 2018 : विराट कोहलीला पळपुट्या म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरला गंभीरने सुनावले
2 विराट कोहलीची सचिन तेंडुलकरशी तुलना करु नका – रिकी पाँटींग
3 सचिन तेंडुलकरने जाधवपूर युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी नाकारली
Just Now!
X