News Flash

इराणमध्ये विमान अपघात, ६६ जणांचा मृत्यू

विमानात ६० प्रवासी आणि ६ क्रू मेंबर होते

इराणच्या एका प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ६६जणांचा मृत्यू झाला. ए.पी. या न्यूज एजन्सीने इराण असेमन एअरलाइन्सने या बाबतीत माहिती दिली आहे. इराणच्या दक्षिण भागात या विमानाचा अपघात झाला आहे. हे विमान तेहरानहून यासूज या ठिकाणी चालले होते. या विमानात बसलेल्या ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तेहरान येथील मेहराबाद इंटरनॅशनल विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र त्याचा अपघात झाला.

या विमानात एका लहान मुलासमवेत ६० प्रवासी बसले होते. तर ६ क्रू मेंबर होते. दोन इंजिन असलेले हे विमान कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते अशी माहिती असेमन एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने इराण टीव्हीला दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आकाशात काहीसे ढगाळ वातावरण होते त्याचवेळी या विमानाचा अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्या कारणाची चौकशी करण्यात येते आहे अशी माहिती असेमन एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान इराणमधील अनेक विमाने जुनी झाली आहेत त्याचमुळे या ठिकाणी विमान अपघातांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळते आहे. इराणने एअरबस आणि बोइंग यांच्यासोबत नवी विमाने घेण्यासाठी करार केले आहेत असेही समजते आहे.

या विमानाने जेव्हा उड्डाण केले त्यानंतर काही क्षणातच रडारशी या विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचा अपघात झाला. हे विमान सेमीरोमजवळ कोसळले. मात्र यातील एकही माणूस वाचू शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:50 pm

Web Title: irans aseman airlines says plane crash in southern iran has killed all 66 people on board
Next Stories
1 राष्‍ट्र भक्तिसाठी भाजपा प्रतिबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही
2 Tripura Election : त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान संपले, ७६ टक्के मतदान
3 श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई जगात १२ व्या स्थानावर
Just Now!
X