11 August 2020

News Flash

सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील राजदूतांची बैठक

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील भारतीय राजदूत यांच्यादरम्यान आज(रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इराकप्रश्नी चर्चा करण्यात आली.

| June 29, 2014 06:08 am

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील भारतीय राजदूत यांच्यादरम्यान आज(रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इराकप्रश्नी चर्चा करण्यात आली. इराकच्या काही भागात तणाव निवळला असून, या भागातील तब्बल १०,००० भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारकडून लवकरच व्यवस्था केली जाईल. या नागरिकांची सुरक्षा आणि सुटका करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात, याबद्दलसुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतात परतण्याची इच्छा असेलल्या नागरिकांच्या परतीची व्यवस्था करण्यासाठी, इराकमध्ये तीन ठिकाणी भारतातर्फे छावणी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2014 6:08 am

Web Title: iraq crisis swaraj chairs meeting of gulf envoys
टॅग Sushma Swaraj
Next Stories
1 संशयित खातेदारांची माहिती देण्याबाबत भारत सरकारची स्वित्झर्लंडला विनंती
2 मोदी गुरुजींची शाळा!
3 भारतीय युद्धनौका पर्शियाच्या आखातात
Just Now!
X