रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना वेडिंगद्वारे स्वस्तात पाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, स्थानकांवरील पाणी घेण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. एक ग्लास पाण्यासाठी पूर्वीच्या दरापेक्षा एक रूपया, तर एक लिटर पाण्यासाठी ५ रूपये मोजावे लागणार आहे.

आयआरसीटीसीच्या डब्ल्यूव्हीएमने पाण्याच्या दरात वाढ करण्याची शिफारस केली होती. रेल्वे बोर्डाने याची चौकशी केली. त्यानंतर ३०० मिलीलिटर अर्थात एक ग्लास पाणी पूर्वी एक रुपयात मिळत होते. आता त्यात एक रूपयांची वाढ करण्यात आली आहे, असे रेल्वे बोर्डाचे उपसंचालक (पर्यटन आणि अन्न) पी.पी. खरात यांनी सांगितले. रेल्वेच्या पुणे विभागाने मुख्य स्थानकांवर १४ डब्ल्यूव्हीएम बसविले आहेत. त्यापैकी पुणे स्थानकावर सहा डब्ल्यूव्हीएम यंत्र मशिन आहेत.

दरवाढ होण्याअगोदर प्रवाशांना एक रुपयात ३०० एमएल अर्थात एक ग्लास पाणी मिळत होते. दरवाढीनंतर एक ग्लास पाण्यासाठी दोन रुपये द्यावे लागणार आहेत. याचबरोबर अर्धा लिटर पाण्यासाठी दोन रुपये द्यावे लागत होते. तेच आता तीन रुपयात मिळणार आहे. ५ रूपयात एक लिटर, तर आठ रुपयात दोन लिटर पाणी मिळणार आहे.