News Flash

खुशखबर ! ५४० रुपयांत फिरा आग्रा, रेल्वेची भन्नाट ऑफर

आयआरसीटीसीच्या साईटवर आग्रासाठी एकूण १२ पॅकेज देण्यात आले असून यामध्ये अर्ध्या दिवसांपासून २ दिवसांपर्यंतचे प्लॅन देण्यात आले आहेत.

सुटीच्या दिवसांत ट्रीपला जायचे म्हटले की अनेकांच्या डोक्यात पहिला विचार येतो तो खर्चाचा. कौटुंबिक सहलीला जाताना आपण या खर्चाचा अंदाज घेतो आणि त्याप्रमाणे रेल्वे आरक्षण आणि इतर गोष्टींचे नियोजन करतो. मात्र आता तुम्ही आग्राला फिरायला जायचे ठरवत असाल तर याठिकाणी अगदी कमी खर्चात तुम्ही अनेक ठिकाणे पाहू शकता. रेल्वे प्रशासनाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. आग्रामध्ये फिरण्यासाठी विशेष पॅकेज तयार करण्यात आली आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे तुम्ही पॅकेज निवडू शकता.

तुम्हाला आग्रा फिरायचे असल्यास ५४० रुपयांत तुम्ही या शहरातील अनेक महत्त्वाची ठिकाणे पाहू शकता. मात्र या पॅकेजसाठी तुम्ही किमान ३ जणांचे बुकींग करणे गरजेचे आहे. दोन जण असतील तर प्रत्येकी ८४० रुपये आकारण्यात येतील तर एक व्यक्ती असल्यास प्रत्येकी १६२० रुपये भरावे लागतील. हे पॅकेज अर्ध्या दिवसाचे असून त्यात सकाळ आणि संध्याकाळ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये एसी कार देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. आयआरसीटीसीच्या साईटवर आग्रासाठी एकूण १२ पॅकेज देण्यात आले असून यामध्ये अर्ध्या दिवसांपासून २ दिवसांपर्यंतचे प्लॅन देण्यात आले आहेत. यात आग्राबरोबरच वृंदावन, मथुरा, ग्वालेर या ठिकाणांनाही जोडण्यात आले आहे. यात साधारण हॉटेलपासून ५ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या हॉटेलनुसार पॅकेजचे रेट ठरविण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 7:55 pm

Web Title: irctc launches half day plan agra tour for 540 rupees if you book for 3 people
Next Stories
1 येडियुरप्पा फक्त एक दिवसाचे मुख्यमंत्री – काँग्रेस
2 महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमती ४ रुपयांनी वाढणार
3 ‘तो’ आमदार सकाळी येडियुरप्पांच्या घरी, संध्याकाळी काँग्रेसच्या कार्यालयात, नक्की कोणासोबत ?
Just Now!
X