‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’द्वारे (आयआरसीटीसी) आता तुम्ही घरबसल्या 10 हजार रुपये कमावू शकतात. यासाठी तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाहीये. यासाठी तुम्हाला केवळ तुमचं आधार कार्ड IRCTC सोबत लिंक करायचं असून किमान एक तिकीट बूक करण्याची गरज आहे. IRCTC अंतर्गत जून 2018 पर्यंत या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.
आधार लिंक केल्यानंतर युझर आपल्या IRCTC अकाउंटवरून एका महिन्यात 12 तिकीट बूक करू शकणार आहे. आधारसोबत अकाउंट लिंक नसलेले युझर एका महिन्यात केवळ 6 तिकीट बूक करू शकतात. या ऑफरला IRCTC ने ‘लकी ड्रॉ स्कीम’ नाव दिलं आहे. या ऑफरनुसार दर महिन्याच्या दुस-या आठवड्यात लकी ड्रॉ काढला जातो. ही संपूर्ण प्रक्रीया संगणकावर आधारित असते. संगणकाच्या आधारे दरमहिन्याला 5 लकी विजेते निवडले जातात. या विजेत्यांना 10 हजार रुपयांची रोख रक्कम मिळते. डिसेंबरमहिन्यापासून ही स्कीम सुरू झाली असून पुढील सहा महिने सुरू असणार आहे.
ज्यांनी आधार केवायसी केलं आहे, आणि ज्यांनी नोंदणी केली आहे अशेच युजर्स या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. युझरने किमान एक तिकीट बूक करण्याची गरज असून, बुकिंग करणा-या युझरची माहिती आयआरसीटीसीच्या प्रोफाइलसोबत जुळायला हवी. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या स्कीमबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 12:22 pm