भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) गुरूवारी संध्याकाळी करण्यात आलेल्या आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचे प्रक्षेपण अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरले. ‘इस्रो’चे अध्यक्ष किरण कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील तळावरून संध्याकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी-३९ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशाच्या दिशेने झेपावला होता. मात्र, उड्डाणाचे सुरूवातीचे टप्पे यशस्वीपणे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यात अंतराळात प्रवेश करताना उपग्रहाभोवतीचे ‘हिट शिल्ड’चे आवरण वेगळे होणे, अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे प्रक्षेपकाच्या अंतर्गत भागापासून विलग होऊनही उपग्रह आतमध्येच अडकून राहिला. त्यामुळे आयआरएनएसएस-१एच उपग्रह अंतराळात प्रक्षेपित होऊ शकला नाही, असे किरण कुमार यांनी सांगितले.

या उपग्रहामुळे भारताच्या एनएव्हीआयसी या सात दिशादर्शक उपग्रहांचा समूह आणखी विस्तारणार होता. १,४२५ किलो वजनाच्या आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचा वापर दिशादर्शन प्रणालीसंबंधी अॅप्लिकेशन्ससाठी होणार होता. हा उपग्रह भारतीय विभागीय दळणवळण उपग्रह यंत्रणेतील प्रणालीतील हा आठवा होता. यापूर्वी आयआरएनएसएस-१ए या उपग्रहाची आण्विक घड्याळे नादुरुस्त झाली होती. त्यामुळे बदली उपग्रह म्हणून आयआरएनएसएस-१एच उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.’इस्रो’च्या आयआरएनएसएस-१ आय या उपग्रहाचे उड्डाण एप्रिल २०१८ मध्ये प्रस्तावित आहे. त्यानंतर आयआरएनएसएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होणार होती. त्यामुळे रेल्वे सर्व्हे, लोकेशनवर आधारित सेवा पुरवण्यासाठी मोठी मदत झाली असती. मात्र, आजच्या अयशस्वी प्रक्षेपणामुळे ही प्रणाली कार्यान्वित होण्यास विलंब लागेल.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

https://twitter.com/ANI/status/903259405029826560