अभिनेता इरफान खान याची प्रमुख भूमिका असलेल्या पानसिंग तोमर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ सोमवारी जाहीर झाले. याच चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याला अभिनेता विक्रम गोखले यांच्यासोबत विभागून देण्यात आला आहे. गोखले यांना अनुमती या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री उषा जाधव हिला ‘धग’ चित्रपटासाठी जाहीर झाला. शिवाजी लोटन पाटील यांना त्यांच्या धग चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, पार्श्वगायन, संगीत या सर्वच प्रकारात मराठी कलाकारांना पुरस्कार मिळाल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर उमटली.

उर्वरित राष्ट्रीय पुरस्कार पुढीलप्रमाणे…
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आरती अंकलीकर-टिकेकर
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – शंकर महादेवन
सर्वोत्कृष्ट पटकथा – सुजॉय घोष (कहानी)
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – भावेष मंडालिया आणि उमेश शुक्ला (ओ माय गॉड)
सर्वोत्कृष्ट संगीत – संहिता (शैलेंद्र बर्वे) आणि कालियाचन यांना विभागून
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – इन्व्हेस्टमेंट
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – विकी डोनर
ज्युरींचा विशेष पुरस्कार – परिणिती चोप्रा
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – अन्नू कपूर
सर्वोत्कृष्ट संकलन – नम्रता राव (कहानी)
सर्वोत्कृष्ट गीत – प्रसून जोशी