भारत आणि अमेरिकेमध्ये या आठवडयात ऐतिहासिक ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘BECA’ करार झाला. या करारामुळे भारताला अमेरिकेचे नकाशे वापरता येतीलच पण त्याचबरोबर अमेरिकेकडून काही महत्त्वाची फायटर विमाने मिळवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. या करारामुळे भारताला नेमकं कुठलं फायटर विमान मिळवता येईल, ते जाणून घेऊया.

F-15EX या घातक फायटर विमानामुळे शत्रूवर अचूकतेने हल्ला करण्याची भारताची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांचा शेजार लाभलेला असताना, असं विमान ताफ्यात असणं खूप आवश्यक आहे. उद्या अमेरिकेने भारताला हे विमान दिलं, तर चीन-पाकिस्तानसाठी ती धोक्याची घंट असेल.