इसिसने पॅरिसपाठोपाठ तुर्कीलाही आपला निशाणा केले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याला २४ तास उलटत नाहीत तोवर तुर्कीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
इसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला असून, यात चार पोलीस जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे तुर्कीमध्ये आजपासून जी- २० परिषद सुरु होणार असून या परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते तुर्कीत आहेत. जी- २०  देशांच्या बैठकीत जगातील प्रमुख विकसित देशांमध्ये अमेरिका (युनायटेड स्टेट्स), ब्रिटन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि ऑस्ट्रेलिया तर उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये चीन, कॅनडा, भारत, ब्राझील, रशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान हे देश सहभाग घेणार आहे.  या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुर्कीत पोहचले आहेत.  हल्ल्यानंतर जी -२० परिषदेसाठी तुर्कीत आलेल्या जगभरातील नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.