News Flash

अमेरिकेच्या कारवाईत ‘इसिस’चा दहशतवादी ठार

सीरीयामधील इसिस दहशतवादी असणाऱया ठिकाणावर छापा टाकून एका दहशतवाद्याला ठार करण्यात अमेरिकेच्या सैनिकांना यश आले.

| May 17, 2015 06:04 am

सीरीयामधील इसिस दहशतवादी असणाऱया ठिकाणावर छापा टाकून एका दहशतवाद्याला ठार करण्यात अमेरिकेच्या सैनिकांना यश आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव अबू सय्यफ असे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना रातोरात दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी छापा टाकला होता.
ओमर तेल क्षेत्रात ही कारवाई झाली. यात दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या एका महिलेचीही त्यांनी सुटका केली. सीरिया सरकारनेही याच ठिकाणी कारवाई करत 40 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 6:04 am

Web Title: is leader abu sayyaf killed in us ground raid
टॅग : Isis
Next Stories
1 चीनशी २२ अब्ज डॉलरचे करार
2 आर्थिक घसरण!
3 नक्वी यांची शिक्षा रद्द
Just Now!
X