14 October 2019

News Flash

पत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना, श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांची मुजोर भाषा

कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या. त्या प्रत्येकवेळी तिथे काँग्रेसची सत्ता होती. पण कोणीही काँग्रेस सरकारच्या अपयशाबाबत प्रश्न उपस्थित केला नाही.

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी खळबळजनक वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला आहे.

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी खळबळजनक वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येवरून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे जबाबदार, असा सवाल मुतालिक यांनी उपस्थित केला आहे. आपल्या वक्तव्यातून मुतालिक यांनी गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या. त्या प्रत्येकवेळी तिथे काँग्रेसची सत्ता होती. पण कोणीही काँग्रेस सरकारच्या अपयशाबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. उलट तेच आता गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन का बाळगले, असा सवाल करत आहेत. कर्नाटकात जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्यालाही मोदीच जबाबदार आहेत का, असा प्रश्नच मुतालिक यांनी उपस्थित केला.

गौरी लंकेश यांच्यासह कलबुर्गी, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा उल्लेख करत मुतालिक यांनी काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

गौरी लंकेश यांची हत्या कशी झाली; जाणून घ्या आरोपीने ‘SIT’ला सांगितलेला घटनाक्रम

 

First Published on June 18, 2018 9:54 am

Web Title: is modi responsible even if any dog dies in karnataka asks pramod muthalik