रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचं वृत्त झळकलं. सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट, मेसेज व्हायरल झालेत. अखेर याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे सत्य ?-
“आरबीआयकडून मार्च २०२१ पासून 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये केला जातोय, मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नाहीये” असं पीआयबीकडून सांगण्यात आलंय. याशिवाय, “आरबीआयकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही” असंही पीआयबीने स्पष्ट केलंय. ट्विटरद्वारे ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने ही माहिती दिली.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!


पीआयबी फॅक्ट चेक :-
व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआयबी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं जातं. पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. यशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.