देशात असहिष्णुता दर्शवणाऱ्या घटना वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, सहिष्णुता आणि मतभेद मान्य करणे यांना उतरती कळा लागली आहे की काय, अशी गंभीर चिंता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी व्यक्त केली.

मानवता आणि बहुतत्त्ववाद कुठल्याही परिस्थितीत त्यागले जाऊ नयेत. समाजातील दुष्ट शक्तींना रोखण्यासाठी आपली सामूहिक शक्ती उपयोगात आणायला हवी, असे ‘नयाप्रजानामा’ या साप्ताहिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मुखर्जी म्हणाले. देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरू झाला आहे काय, याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली.
सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे व मतभेद मान्य केले आहेत. किती तरी भाषा, १६०० बोलीभाषा आणि ७ धर्म भारतात सहकार्याने नांदतात. आपली घटनाही या सर्व मतभिन्नतांना सामावून घेते, असे राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितले. मुंबईमध्ये शिवसेनेच्या दबावामुळे गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक आणि भारतीय व पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांची बोलणी रद्द होणे या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपतींनी समाजात मतांतरे मान्य करण्याची गरज कडक शब्दांत अधोरेखित केली.

विविधता, सहिष्णुता आणि बहुतत्त्ववाद या महत्त्वाची सांस्कृतिक तत्त्वांनी भारताला अनेक शतके संघटित ठेवले असून ती वाया जाऊ दिली शकत नाहीत, असे राष्ट्रपतींनी यापूर्वी दादरी येथे एका इसमाला ठार मारण्यात आल्यानंतर म्हटले होते. ‘जॉतो मत, तॉतो पथ’ (जितके धर्म, तितके मार्ग) या रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणुकीची मुखर्जी यांनी आठवण करून दिली.
मुंबईमध्ये शिवसेनेच्या दबावामुळे गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक आणि भारतीय व पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांची बोलणी रद्द होणे या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपतींनी समाजात मतांतरे मान्य करण्याची गरज अधोरेखित केली. विविधता, सहिष्णुता या महत्त्वाची सांस्कृतिक तत्त्वांनी भारताला अनेक शतके संघटित ठेवले असून ती वाया जाऊ दिली शकत नाहीत, असे म्हटले होते.