इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी अटक करण्यात आलेले सनदी पोलीस अधिकारी एन. के. अमिन यांनी आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमिन यांचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणी लवकर घेण्याची विनंती केल्यानंतर सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या पीठाने या प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्ट रोजी घेण्याचे मुक्रर केले.