28 November 2020

News Flash

इशरतजहाँ प्रकरण : ३ पोलिसांची याचिका फेटाळली

प्रकरणातून आपल्याला मुक्त करण्याची केलेली मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

(संग्रहित छायाचित्र)

इशरतजहाँ बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून आपल्याला मुक्त करण्याची केलेली मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

या तीन आरोपींमध्ये भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी जी. एल. सिंघल, पोलीस उपअधीक्षक (निवृत्त) तरुण बारोट आणि उपनिरीक्षक अननू चौधरी यांचा समावेश आहे. या प्रकरणातील चौथे आरोपी निवृत्त पोलीस उपअधीक्षक जे. जी. परमार हे होते, त्यांनीही या प्रकरणातून आपल्याला मुक्त करावे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती, मात्र काही दिवसांपूर्वीच परमार यांचे निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:36 am

Web Title: ishrat jahan case petition of 3 policemen rejected abn 97
Next Stories
1 ‘पुढील तीन महिने निर्णायक’
2 ‘अमेझॉन’विरुद्ध हक्कभंगाची तयारी
3 बिहारमध्ये काश्मीर, चीन प्रश्नाचे प्रचारास्त्र
Just Now!
X