News Flash

इशरत जहॉं चकमक बनावटच; राजेंद्र कुमार यांचेही नाव आरोपपत्रात

इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांना गुजरात पोलिसांनी बनावट चकमकीत मारल्याचा ठपका सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ठेवला.

| July 3, 2013 05:44 am

इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांना गुजरात पोलिसांनी बनावट चकमकीत मारल्याचा ठपका सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ठेवला. या आरोपपत्रात गुप्तवार्ता विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचेही नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आले आहे.
गुजरात पोलिसांनी २००४ मध्ये केलेल्या कारवाईत इशरत जहॉं आणि तिच्या तीन मित्रांची दहशतवादी म्हणून अहमदाबादजवळ चकमकीत हत्या केली होती. याप्रकरणी विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीमध्ये ही चकमक बनावट असल्याची माहिती पुढे आली होती. सीबीआयच्या अहमदाबादमधील विशेष न्यायालयात बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
इशरत जहॉं, जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि झिशन जोहर यांची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सीबीआयनेच या खटल्याचा तपास केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2013 5:44 am

Web Title: ishrat jahan was killed in fake encounter
Next Stories
1 झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिकाधिक तीव्र करणार
2 सिबेरियात हेलिकॉप्टर कोसळून लहान मुलांसह १९ जण ठार
3 खुशखबर!’ब्लॅकबेरी’ची मोबाईल एक्सचेंज योजना
Just Now!
X