News Flash

अमेरिकेच्या मदतीनं ISI कडून दशतवाद्यांना प्रशिक्षण : इम्रान खान

सोव्हिएत संघाविरोधात जिहाद पुकारण्यासाठी अमेरिकेनं प्रशिक्षण दिलं होत

इम्रान खान

पाकिस्तानने 1980 मध्ये अमेरिकेच्या मदतीने सोव्हिएत संघाविरोघात जिहाद पुकारला होता. अमेरिकेच्या मदतीनेच आयएसआयने जगभरातील मुस्लीम देशांमधून दहशतवाद्यांना बोलावून सोव्हिएत संघाविरोधात जिहाद पुकारण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली.

अमेरिकेच्याच मदतीनं ISI कडून दशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं इम्रान खान म्हणाले. काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्समध्ये बोलताना पुन्हा एकदा त्यांनी पाकिस्तानात दहशतवाद वाढीस लागण्यास अमेरिका कारणीभूत असल्याचं म्हटलं. ज्यावेळी अमेरिकेच्या मदतीनं पाकिस्ताननं जिहाद पुकारला होता त्यानंतर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रिगन यांनी आपल्याला वॉशिंग्टनमध्ये बोलावल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी तालिबानसोबत अचानक चर्चा थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावरही भाष्य केलं. “अफगाणिस्तानमधील समस्या ही लष्कराच्या कारवाईनं सुटणार नाही. 2008 मध्ये ओमाबा प्रशासनालाही ही बाब मी सांगितली होती. परंतु त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. परदेशी सैन्याविरोधात अफगाण कायम एकत्र येतात. आज पाकिस्तानातही हजारो अफगाणी निर्वासित आहेत. ट्रम्प सरकारने शांतता करार रद्द केल्याबद्दल आम्ही वृत्तपत्रातून वाचलं आहे. ही एक मोठी चूक आहे आणि याबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा केली करू,” असं इम्रान यावेळी म्हणाले. “संपूर्ण अफगाणिस्तानवर आपण पुन्हा एकदा नियंत्रण मिळवू शकत नाही, तसंच अफगाणिस्तानच्या लष्करावरही ताबा मिळवू शकत नाही, हे आता तालिबानलाही माहित आहे. राजकीय समाधान हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे, अन्यथा अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानमधून बाहेर पडता येणार नाही,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 8:51 am

Web Title: isi training terrorists with us help pakistan pm imran khan america jud 87
Next Stories
1 ट्रम्प यांचे दोन दगडांवर पाय; पाकिस्तानला पण चुचकारलं
2 तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलं; जगभरातील नेत्यांवर ग्रेटा थनबर्ग संतापली
3 अल कायदाला प्रशिक्षण पाकिस्तानातच; इम्रान खान यांची कबुली
Just Now!
X