News Flash

Isis Bombing kills 119 in bagdhdad: बगदादमध्ये स्फोटात ११९ ठार

इराकची राजधानी बगदाद रविवारी दोन बॉम्बस्फोटांनी हादरली.

| July 4, 2016 10:24 am

Isis Bombing kills 119 in bagdhdad: बगदादमध्ये स्फोटात ११९ ठार
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बगदादमध्ये दोन बॉम्बस्फोटांत पंधरा मुलांसह ९१ ठार तर २०० जण जखमी झाले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने उत्साह असताना लोक शॉपिंग करीत होते त्या वेळी हे दोन स्फोट झाले. करादा येथे एक ट्रक रेफ्रिजरेटर स्फोटकांनी भरवून उडवण्यात आला. त्यात ८० ठार तर इतर २०० जण जखमी झाले. 

१७० जखमी, आयसिसने जबाबदारी स्वीकारली

इराकची राजधानी बगदाद रविवारी दोन बॉम्बस्फोटांनी हादरली. भर बाजारात करण्यात आलेल्या कारबॉम्बस्फोटांत तब्बल ११९ जण ठार झाले तर १७० जण जखमी झाले. स्फोट एवढा भीषण होता की परिसरातील इमारतींनी पेट घेतला, तर अनेक दुकाने उद्ध्वस्त झाली. या स्फोटाची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

रमजानच्या पाश्र्वभूमीवर बगदादमधील करद्दा बाजारपेठ गर्दीने फुलली होती. रविवारी सकाळी या बाजारपेठेत आत्मघातकी बॉम्बरने एका वर्दळीच्या शॉपिंग सेंटरच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उडवून दिली. त्यात ११९ जण ठार झालेत तर १७० जण जखमी झाले. दुसरा हल्ला बगदादच्या उत्तरेकडील शाब भागात झाला. आयईडीने घडवून आणलेल्या या स्फोटात पाच जण ठार झाले. इराकी फौजांनी आयसिसच्या ताब्यातून फलुजा शहर ताब्यात घेतल्यानंतर आयसिसने केलेला हा यंदाच्या वर्षांतील सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला आहे. इराकमधील आता केवळ मोसुल हेच शहर आयसिसच्या ताब्यात आहे. भर बाजरपेठेत घडवून आणलेला स्फोट एवढा भीषण होता की अनेक मृतदेह ओळखण्याच्याही पलीकडचे होते. मृतदेहांचा खच रस्तोरस्ती पडला होता. परिसरातील अनेक इमारतींनी पेट घेतला तर अनेक दुकाने उद्ध्वस्त झाली. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी घटनास्थळाला भेट दिली.

न्यूयॉर्कमधील स्फोटात एक जण जखमी

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्क येथे रविवारी झालेल्या स्फोटात एका नागरिकाचा पाय जायबंदी झाला. स्फोट कशाने झाला आणि तो घातपाताचा प्रकार होता का, हे नेमके समजू शकले नाही. ४ जुलै रोजी अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला शहरात ठिकठिकाणी आतषबाजीची तयारी सुरू आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचा पाय चुकून स्फोटक पदार्थावर पडून स्फोट झाला. पण ती घातपाताच्या उद्देश्याने पेरलेली स्फोटके होती का आतषबाजीच्या दारूचा स्फोट झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र बांगलादेश, इस्तंबूल आणि बगदाद येथे नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर या स्फोटाने घबराट पसरली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 1:04 am

Web Title: isis bombing kills 119 ramadan shoppers in baghdad
Next Stories
1 दहशतवाद्यांना आणणाऱ्या चालकाची ओळख पटली
2 अपंगांना ३ टक्के आरक्षण देण्याचा केंद्राला आदेश
3 तारुषी जैनचा मृतदेह आज भारतात आणणार
Just Now!
X