सध्या जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना व सर्व देश करोनापासून वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सामान्य लोकांमध्ये सध्या करोनामुळे चिंतेचं वातावरण आहे, इतकच काय जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयसिसलाही करोनाची धास्ती आहे. आयसिस संघटनेने आपल्या अतिरेक्यांसाठी एक नियमावलीच जाहीर केली आहे.

आयसिसचं दहशतवादी संघटनेचं वृत्तपत्र असलेल्या ‘अल-नाबा’मध्ये करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजना दिल्या आहेत. यामध्ये आजारी व्यक्तींपासून दूर राहणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवणे, जेवणाआधी हात धुणे, करोनाची लागण असलेल्या युरोपमध्ये जाणं टाळणे अशा सुचनांचा समावेश करण्यात आला आहे. याचसोबत अल्लाहवर विश्वास ठेवून त्याला शरण जाण्याचाही पर्याय सुचवण्यात आला आहे. करोनाची लागण ही अल्लाहच्या अवकृपेमुळे होत असल्याचंही अल-नाबा वृत्तपत्रात म्हटलं आहे.

यावेळी इराक आणि सिरीयामधील आयसीसचं वर्चस्व असलेल्या भागात अधिक जागता पहारा देण्याचे आदेशही अतिरेक्यांना देण्यात आल्याचं समजतंय. इराकमध्ये आतापर्यंत ७९ लोकांना करोनाची लागण झालेली असून…८ लोकांचा मृत्यू झाला आहे.