News Flash

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ‘आयसिस’चा म्होरक्या बगदादी ठार

आयसिसच्या प्रभावाखाली असलेल्या सीरियाच्या उत्तर भागात बगदादीचा मृत्यू

अमेरिकी आघाडीच्या हवाई हल्ल्यात जखमी झालेला आयसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू अल बगदादी याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आयसिसच्या प्रभावाखाली असलेल्या सीरियाच्या उत्तर भागात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती इराकच्या येनी सफक या वृत्तपत्राने दिली आहे. याशिवाय, अल-अमेक या अरेबिक वृत्तसंस्थेनेही निवेदनाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयसिसचा म्होरक्या बगदादी याचा रविवारी मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, इराकच्या निनेवह प्रांतात बगदादी जखमी झाला असून आयसिसचे इतर काही दहशतवादीही या कारवाईत जखमी झाल्याचे वृत्त इराकच्या अल सुमारिया या दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीने दिले होते. आंतरराष्ट्रीय आघाडीने आयसिसच्या ठिकाणांवर इराक-सीरिया दरम्यानच्या सीमेवर हल्ले केलेला हा भाग निनेवेहपासून पश्चिमेला ६५ किलोमीटर अंतरावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 1:06 pm

Web Title: isis leader abu bakr al baghdadi killed in us led airstrikes in syria reports
Next Stories
1 फ्रीजबद्दलची तक्रार आणि सुषमा स्वराज यांचा मदतीस नकार..
2 VIDEO : मुजोर मद्यपी वाहनचालक तरुणाची तीन जणांना टक्कर, दोघांचा मृत्यू
3 उत्तर प्रदेशसाठी भाजप दक्ष
Just Now!
X