इस्राएलच्या गुप्तचर यंत्रणांमुळे दहशतवाद्यांना अटक

इस्राएलच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीमुळे ऑस्ट्रेलियाचे विमान पाडण्याचा आयसिसचा डाव उधळण्यात आल्याचा दावा इस्राएलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केला आहे.

इस्राएलच्या गुप्तचर यंत्रणांनी ऑस्ट्रेलियाचे विमान पाडण्याचा डाव उधळून लावल्याचे नेतान्याहू यांनी येथे परिषदेत सांगितले. आयसिसचा डाव यशस्वी झाला असता तर त्याचा जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा विपरीत परिणाम झाला असता, असेही ते म्हणाले.

इस्राएल लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने २०१७ मध्ये दिलेल्या गोपनीय माहितीमुळे या हल्ल्याची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात झाली, असे लष्कराने म्हटले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुप्तचर यंत्रणेने गोपनीय माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले.

हल्ला उधळून लावण्यात आल्याने अनेकांचे प्राण वाचले असल्याचा दावा इस्राएलच्या लष्कराने केला. मात्र सदर विमानाची वेळ आणि मार्ग या बाबतचा तपशील देण्यात आलेला नाही.