इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला शुक्रवारी रात्री दिल्लीत झालेल्या चकमकीनंतर अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडे दोन प्रेशर कुकरमध्ये १५ किलो IED होते. अबू युसूफ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो खोरसाना प्रांतातील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.

या दहशतवाद्याने काही महिन्यांपूर्वी गावामध्ये स्फोटकांची चाचणी केल्याचे पोलिसांना सांगितले. तो थेट ISIS च्या कमांडर्सच्या संपर्कात होता. पत्नी आणि चार मुलाचे त्याने पासपोर्ट सुद्ध बनवले होते. अबू युसूफ आधी युसूफ अलहिंदीच्या इशाऱ्यावरुन काम करायचा. युसूफ अलहिंदी सिरियामध्ये मारला गेला. त्यानंतर तो अबू हुझाफाच्या सूचनांचे पालन करत होता. हा अबू हुझाफा पाकिस्तानी होता. अफगाणिस्तानाच ड्रोन हल्ल्यामध्ये हा हुझाफा मारला गेला असे स्पेशल सेलच्या डिसीपींनी सांगितले.

आणखी वाचा- इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश ATS ची टीम दिल्लीत दाखल

करोना व्हायरसमुळे त्याला त्याचे कट पूर्णत्वाला नेता आले नाहीत. १५ ऑगस्टला दिल्लीमध्ये हल्ला करण्याची त्याचा प्लान होता. पण दिल्लीतल्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामुळे त्याचा प्लान फसला असे स्पेशल सेलच्या डीसीपींनी सांगितले. अबू युसूफवर मागच्या वर्षभरापासून तपास यंत्रणा लक्ष ठेऊन होत्या.