News Flash

आयसिसशी संबंधित सव्वालाख ट्विटर खाती बंद

२०१५ च्या मध्यावधीत १,२५,००० खाती बंद करण्यात आली

| February 7, 2016 03:07 am

ट्विटर या मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळाने आयसिस गटाशी संबंधित असलेली १,२५,००० खाती बंद केली आहेत, या खात्यांवरून दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन दिले जात होते, असे असले तरी भारताशी संबंधित दहशतवादी संस्था व व्यक्तींची ट्विटर खाती कायम ठेवण्यात आली आहे.
एका ब्लॉगमध्ये कंपनीने म्हटले आहे, की दहशतवाद्यांचा धोका कमी झालेला नसताना आमचे संकेतस्थळ त्या भागांमध्ये असल्यामुळे आयसिसशी संबंधित ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत.
२०१५ च्या मध्यावधीत १,२५,००० खाती बंद करण्यात आली, कारण या खात्यांवरून आयसिसचा प्रचार केला जात होता व दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:07 am

Web Title: isis related million twitter accounts blocked
टॅग : Isis
Next Stories
1 नौदलाच्या सामर्थ्यांचे प्रदर्शन
2 प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांचे निधन
3 तालिबानच्या हल्ल्यात ९ ठार, ४० जखमी
Just Now!
X