25 February 2021

News Flash

आयसिसच्या दोन संशयितांना १२ दिवसांची पोलीस कोठडी

या दोघांजवळून जे बाँब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले, ते त्यांनी कोठून आणले

| February 28, 2017 02:22 am

छायाचित्र प्रातिनिधिक

गुजरातमध्ये स्वतंत्र हल्ले घडवून आणण्याचा कट रचल्याच्या आणि आयसिसशी संलग्न असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या दोन भावांची स्थानिक न्यायालयाने सोमवारी १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

वसीम रामोडिया व नईम रामोडिया या दोघांना रविवारी अटक करणाऱ्या गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) त्यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर.ए. सिंग यांनी त्याला फक्त १२ दिवसांची कोठडी मंजूर केली.

या दोघांजवळून जे बाँब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले, ते त्यांनी कोठून आणले; यापूर्वी त्यांनी स्फोट किंवा इतर देशविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता काय आणि आयसिसचे स्लीपर सेल्स गुजरातमध्ये सक्रिय आहेत काय याबद्दलची माहिती घेण्यासाठी एटीएसने त्यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती, असे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश फालदु यांनी सांगितले.

अनुक्रमे एमसीए व बीसीए पदवीधारक असलेले वासीम व नईम हे दोघे आयसिसच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते आणि चोटिलासारख्या धार्मिक ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट त्यांनी आखला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे राबवलेल्या मोहिमेत वसीमला राजकोट येथून, तर नईमला भावनगर येथून अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 2:22 am

Web Title: isis suspects gujarat crime
Next Stories
1 रेल्वेत ७ रुपयांमध्ये कॉफी, ५० रुपयांमध्ये जेवण; नवे खानपान सेवा धोरण लागू
2 ‘मेक इन इंडिया’ला धक्का; ‘या’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
3 देशभरातील ३०० रेल्वे स्थानकांवर शीतपेयांच्या विक्रीला रेड सिग्नल
Just Now!
X