News Flash

ISIS Sex Slaves: ‘सेक्स स्लेव्ह’ बनण्यास नकार देणाऱ्या १९ मुलींना आयसिसने जिवंत जाळलं

मोठ्या जनसमुदायासमोर या मुलींना जाळण्यात आले.

परभणीतील एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अकाऊंट्सवरुन सीरियामधील फारुख नावाच्या तरुणाच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

आयसिसच्या दहशतवाद्यांनी १९ मुलींना लोखंडी पिंजऱ्यात बंद करून जिवंत जाळण्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या मुलींनी ‘सेक्स स्लेव्ह’ बनण्यास नकार दिल्याने आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांना क्रुरपणे जिवंत जाळल्याचे ‘एआरए न्यूज’च्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटले आहे. मोसुल येथे मोठ्या जनसमुदायासमोर या मुलींना जाळण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजते. आयसिसच्या दहशतवाद्यांबरोबर सेक्स करण्यास त्यांनी नकार दिल्याने दहशतवाद्यांकडून त्यांना ही शिक्षा देण्यात आली. १९ मुलींना शेकडो लोकांसमोर जिवंत जाळून ठार मारण्यात आले. हा क्रुर अत्याचार पाहण्याशिवाय उपस्थितांकडे दुसरा पर्याय नव्हता, असे अबदुल्ला-अल-माल्ला या माध्यम प्रतिनिधीने ‘एआरए न्यूज’ला सांगितले.
ऑगस्ट २०१४ मध्ये उत्तर इराकमधील सिंजर प्रदेशावर कब्जा मिळवल्यावर आयसिसने ३००० हून अधिक मुलींना ‘सेक्स स्लेव्ह’ बनवले होते. या प्रदेशातील जवळजवळ चार लाख लोकांनी इराकमधील कुर्दिस्थान प्रदेशातील दोहक आणि इरबिल येथे पलायन केले होते. कुर्दिस्तान प्रदेशातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पळवून नेण्यात अलेल्या जवळजवळ १८०० महिला आणि मुलींना आयसिसने इराक आणि सीरियात बंदी बनवून ठेवले आहे..
आयसीसने २०१४ मध्ये मोसुलवर कब्जा करून इराक आणि सीरियापर्यंत पसरलेल्या स्वात प्रदेशात आपली अतिरेकी कारवायांची राजधानी स्थापित केली. इराकी सेनेने आपले शिया सैन्य आणि अमेरिकी मित्र राष्ट्र सेनेच्या हवाई हल्ल्याच्या मदतीने गेल्या २४ मार्च रोजी आयसिसच्या ताब्यात असलेला मोसुल प्रदेश मुक्त करण्यासाठी आक्रमक पवित्रा उचलला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 12:39 pm

Web Title: isis terrorists burns 19 yazidi girls for denying sex slaves
टॅग : Iraq,Isis,Terrorist
Next Stories
1 गव्हर्नरपदी फेरनियुक्तीच्या प्रश्नावर रघुराम राजन यांचे खास शैलीत उत्तर!
2 पाहा: व्हिडिओ गेमच्या माध्यमातून त्याने प्रेयसीला घातली लग्नाची मागणी
3 RBI Monetary Policy: रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर ‘जैसे थे’
Just Now!
X